मुंबई – अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणारे बोगस डॉक्टर आणि एजंटसह ६ जणांच्या टोळीला ट्रॉम्बे पोलीसांनी अटक केली आहे.
गोरीबी उस्मान शेख, शबाना झाकीर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख आणि रिना नितीन चव्हाण अशी यांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, बालकाच्या जन्माबाबत अगर दत्तक विधानाबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न देता, खाजगी इसमाकडून रू. ५,००,०००/- स्विकारून बाळ खाजगी महिलेच्या ताब्यात देऊन लहान बाळाची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून २ महिला आणि नवजात बालकास ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी तपास करून त्याआधारे इतर आरोपींना अटक केली.
दरम्यान, यातील सायराबानो नबीउल्ला शेख (बोगस डॉक्टर) आणि ज्युलीया लॉरेन्स फर्नाडीस ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघींवर अशाच प्रकारचे ४ गुन्हे दाखल आहेत.