डोंबिवली – डोंबिवली ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील कोपर रोडवरील लक्ष्मण पावशे हि बिल्डिंग कोसळून ४ ते ५ तास उलटले असून, अजूनही त्या बिल्डिंगचा ढिगारा उचलण्याचे काम सुरु झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण पावशे या बिल्डिंगचा काही भाग आज दुपारी ३ च्या सुमारास कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, केडीएमसी अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. परंतु अजूनही ढिगारा उचलण्याचे काम तेथे सुरु झालेले नाही. बिल्डिंग कोसळ्यानंतर बिल्डिंगचा उर्वरित भाग निष्कासित करण्यासाठी जी काही साधनसामुग्री लागते ती अजूनही तेथे पोहोचलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि अधिकारी वर्ग त्याठिकाणी अजूनही उभे आहेत.
यावरून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन किती जबाबदारीने काम करत आहे हे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आपत्ती विभाग काम करण्यास कुचकामी ठरत आहे.
दरम्यान, या बिल्डिंगमधील लोक वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु जर केडीएमसीच्या भरवश्यावर हि लोक राहिली असती तर या लोकांचे नाहक जीव गेले असते.
या प्रकारावरून पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन यापुढे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयुक्त काय उपाययोजना करणार आहेत हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे तसेच महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी घटनास्थळावरील काही नागरिकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.