मुंबई – शिवाजी पार्क मधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये एक मगर आढळली असून, तिला पकडून ड्रममध्ये ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्याने या मगरीला पाहिले त्यानंतर तिला पकडून एका ड्रममध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.