मुंबई – आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. ठिक-ठिकाणी गणरायावर फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. आकर्षक अशा रांगोळीने रस्ते सजले आहेत. मिरवणूका पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे. दरम्यान, गणपती विसर्जनासाठी महापालिकेने देखील जय्यत तयारी केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.