मुंबई – जन्मदात्या आईने आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला (मुलीला) इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना मुलुंडमध्ये घडली असून, या घटनेत बाळाचा मृत्यू झाला आहे. आईने मानसिक तणावातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मनाली मेहता असे या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निळकंठ अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. मनाली मेहता ही आपल्या माहेरी आली होती. मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते, त्यामुळे मनाली तणावात होती. या तणावातून मनालीने आपल्या मुलीला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला असता, हे बाळ मनालीचे असल्याचे स्पष्ट झाले.