ठाणे – वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर शाळे मागे, शफीक कंपाउंड येथे छोट्या नाल्यामध्ये एक घोरपड आढळून आली. या घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली असून, सदर घोरपड वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
दरम्यान, ही घोरपड मादी असून, तिचे वजन साधारणत: १.६०० ग्रम आहे आणि ती ४ ते ५ महिन्याची होती अशी माहिती वन विभागाकडून मिळाली आहे.