मुंबई – पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका एअर हॉस्टेसची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. इमारतीत सफाईच काम करणारा हा व्यक्ती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपल ओगरे असे मृत एअर हॉस्टेस तरूणीचे नाव असून ती मरोळ येथील एक इमारतीतील फ्लॅटमध्ये रहात होती. तिच्यासोबत तिची बहीण आणि मित्र देखील राहत होते. ते दोघेही गावी गेले होते. या घरातच या तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला तसेच तपास करत इमारतीत सफाईच काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.