जालना – सातबाऱ्यावरील अज्ञान पालनकर्ता हा शेरा कमी करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच घेताना निकळक येथील महिला तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रेखा पुरूषोत्तम मानेकर असे या लाचाखोर तलाठी महिलेचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांनी त्यांच्या सातबा-यावरील अज्ञान पालन कर्ता (अ पाक) शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दिला होता, त्यावरून तलाठी यांनी त्यांची नोंद कमी न केल्याने तक्रारदार यांनी पुन्हा लेखी अर्ज दिला, तेव्हा तलाठी मानेकर यांनी सदर काम करण्यासाठी २,०००/- रुपये लाचेची मागणी केली.
सदरबाबत तक्रादार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मानेकर यांना २,०००/- रुपये लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.