डोंबिवली – मुंबई गोवा महामार्गाच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत जनजागृती, प्रभावीपणे पाठपुरावा करणाऱ्या सर्व अराजकीय सामाजिक संस्था, संघटना, कोकणकर, कोकणस्थ पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चा सत्रात मुंबई गोवा महामार्गासाठी काही मुद्दे असतील तर ते समजून घेऊन त्यांचे निरसन करून सुरू असलेले काम अधिक सुसाट वेगाने पूर्ण करण्यासाठी, तसेच सर्वांची मत – मतांतरे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे खुले चर्चासत्र आयोजित केले आहे.
कोकणातील सर्वच संस्था तसेच संघटना, गावकरी – सीमावर्ती, पत्रकार बंधू – भगिनी आपापले परीने एकत्रित अथवा वैयक्तिकरीत्या काम करत असाल, मायबाप शेतकरी असाल, व्यावसायिक असाल – मुंबई, ठाणे अगर नवीन मुंबईत पोटा पाण्यासाठी वास्तव्य करत असाल, ज्यांची नाळ कोकणाशी जोडली आहे असे सर्वजण एकत्र येऊन मुंबई गोवा महामार्गाचे पूर्ततेसाठी होणाऱ्या दिरंगाईबाबत आपली मत या चर्चासत्रात मांडू शकतात.
खुले चर्चासत्र ठिकाण :- डोंबिवली जिमखाना, पेंढारकर कॉलेज समोर, डोंबिवली (पूर्व)
तारीख आणि वेळ :- रविवार दिनांक २७.०८.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत