मुंबई – घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात एका महिलेला गुन्हे शाखा कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक केली. मिनता राजभर असे या महिलेचे नाव आहे.
विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चोरट्याने फ्लॅटमधील असलेले सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १०,००,०००/- (दहा लाख) रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करून नेल्याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मिनता राजभर हिला अटक केली. तिच्याकडे सदर गुन्ह्यातील ९,८४,०७७/- रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल तिला घरफोडी चोरी करणा-या एका सराईताने दिला असल्याचे निष्पन्न झाले आहे.