मुंबई – अवैध अग्निशस्त्रे व दारुगोळा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना २ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह कक्ष ११, कांदिवली पोलिसांनी अटक केली.
निलेश आणि अमुल अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी कांदिवली पश्चिमेला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ २ देशी बनावटीचे पिस्टल व त्यामध्ये ५ जिवंत काडतुसे मिळाली.
सदर प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.