ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. अशी माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले होते. त्यानंतर पुन्हा एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अपुऱ्या सोयीसुविधा आणि रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ यामुळे इतके मृत्यू झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.