मुंबई – मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै २०२३ मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये कायम राहील, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणी कपात ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे.