डोंबिवली – शिक्षण क्षेत्रात नामांकित आणि आता जगभरात विद्यार्थी असलेल्या खर्डीकर क्लासेसला मिड डे एज्युकेशन आयकॉन 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मधील ताज प्राईम इंटरॅशनल हॉटेलमध्ये मिड डे वृत्तपत्राचा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. शिक्षण क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या यशस्वी शिक्षण संस्था, प्राध्यापक तसेच शैक्षणिक समाजकार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मिड डे च्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला डोंबिवलीमधील ख्यातनाम व्यावसायिक तसेच जगभरात विद्यार्थी असलेल्या नामांकित प्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉ. सुनील गणपत खर्डीकर यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मिड डे चा एज्युकेशन आयकॉन 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारत असताना दीपक केसरकर यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले तसेच सुनील खर्डीकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

डॉ. सुनील खर्डीकर हे खर्डीकर क्लासेस चे संस्थापक असून त्यांनी आतापर्यंत जवळपास १८ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जेमतेम विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेला खर्डीकर क्लासेस हा आता केवळ महाराष्ट्र राज्याकरिता मर्यादित राहिलेला नसून तो आता महाराष्ट्र बाहेरील राज्यांमध्ये तसेच परदेशात दुबई पर्यंत पोहोचला आहे. परदेशात असलेले विद्यार्थी देखील ऑनलाईन प्रणाली द्वारे खर्डीकर क्लासेस मध्ये शिक्षण घेत असून यश संपादन किरीत आहेत.
शहर पातळी पासून सुरू झालेला हा क्लास पुढे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव मोठे करू लागला आहे. गुजरात, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिसा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याचबरोबर दुबई अशा वेगवेगळ्या राज्य व देशातून अनेक विद्यार्थी खर्डीकर क्लासेसमध्ये सध्या ऑनलाइन पध्दतीने शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत या क्लासेस मधील २४० विद्यार्थ्यांना ९०% हुन अधिक गुण असून जवळपास २ हजार विद्यार्थी ८०% मिळवणारे आहेत. याच क्लासेस मध्ये शिकून अनेक विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान अशा देशांत उच्च पदावर कार्यरत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून खर्डीकर क्लासेस या ब्रँडला मिड डे ने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. याबद्दल डॉ.सुनील खर्डीकर यांनी मिड डे चे आभार मानले.
अगदी पाच सहा विद्यार्थ्यांपासून मी खर्डीकर क्लासेसचा शुभारंभ केला. त्या छोट्याशा रोपट्याचा विस्तार आता मोठ्या वटवृक्षामध्ये झाला असून त्याच्या सावलीत हजारो विद्यार्थी मोठे झाले. माझे विद्यार्थी आज परदेशात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. शिक्षण हा माणसाला यशाकडे घेऊन जाणार महामार्ग असून मी त्या महामार्गावरचा एक सारथी, वाट दाखवणारा मार्गदर्शक आहे. खर्डीकर क्लासेस शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करीत राहील अशा भावना यावेळी डॉ. सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या.