अमरावती – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे १५३ कलम अंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विधिमंडळासह राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.