बुलढाणा – मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या २ बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ जण जखमी झाले आहेत. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक ६ वरील लक्ष्मी नगर उड्डाण पुलावरती या २ बस समोरासमोर धडकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार या बसेसपैकी १ बस अमरनाथहून हिंगोलीला जात होती. तर दुसरी बस नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात होती, त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.