नवी दिल्ली – मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना परवानगी दिली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेला अविश्वास ठराव लोकसभा अध्यक्षांनी मंजूर केला आहे.
सत्ताधारी मोदी सरकारकडून मणिपूर मुद्दावर चर्चा करण्यास तयारी दाखवण्यात आली नव्हती. याबाबत विरोधकांनी अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्य केली आहे.
या अविश्वास प्रस्तावावर चर्चेची वेळ आणि तारीख नंतर निश्चित केली जाईल, असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे. अविश्वास प्रस्ताव स्वीकारताना ओम बिर्ला म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहे. चर्चेनंतर प्रस्ताव कधी मांडायचा याची तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल.