ठाणे शहरात रविवार पर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार…

Published:

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला असून त्याचा पंपाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिमाण झाला आहे. त्यामुळे शनिवार, २२ जुलै आणि रविवार, २३ जुलै रोजी ठाणे महापालिका क्षेत्रात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला असून त्याचा पंपाद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिमाण झाला आहे.

तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने तसेच गाळून व उकळून वापरावे असे आवाहन, ठाणे महापालिकेने केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page