डोंबिवली – टँकरमधून केमिकलची चोरी आणि चोरी केलेले केमिकल खरेदी करणारे अशा ७ जणांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सोनवणे, पंडित सोनावणे, एकनाथ अण्णा मार्के उर्फ नाथ, मुशरत खान, जतीन शहा, मंजितसिंग, गुड्डू उर्फ आफताब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, पहाटेच्या सुमारास मेसर्स विन्ट्री इंजिनियरींग आणि केमिकल्स प्रा. लि. च्या समोर, रोडचे पलीकडे, आराध्या मार्बल अँन्ड ग्रेनाईट कंपनीचे बाजूला असलेल्या शेड मध्ये व मोकळ्या जागेत खंबाळपाडा रोड, खंबाळपाडा, डोबिवली पूर्व येथे १ इसम केमीकल टँकर मधून वेगवेगळ्या केमीकलची वाहतूक करणा-या टँकर चालकांशी संगनमत करून, सदर टँकर त्याच्या गोडाऊनमध्ये नेऊन त्यामधून बेकायदेशीररीत्या केमीकलची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकणी छापा टाकला असता त्याठिकाणी गणेश सोनवणे आणि मुशरत खान हे दोघे टँकर मधून केमिकलची चोरी करत असताना रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत गणेश सोनवणे याने सांगीतले की, सदर जागेचा मालक तो स्वतः आहे. सदर जागेत तो व त्याचा भागीदार पंडीत सोनवणे हे एकनाथ अण्णा मार्के उर्फ नाथा यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररीत्या केमीकल टँकर मधून केमीकलची चोरी करून भिवंडी येथील जतीन शहा आणि मंजितसिंग, गुड्डु उर्फ आफताब यांना विक्री करत असल्याचे सांगितले.
तसेच मुशरत खान यांच्याकडे चौकशी केली असता तो टँकरचा चालक असल्याचे सांगीतले. तसेच सदर टँकर ओम बल्क कॅरीअर्स यांचा असून टँकर मधील केमीकल नेहा केमीकल यांच्या मालकीचे असून, सदरचे केमीकल जेएनपीटी येथून लोड केले असून त्याची डीलीव्हरी धुळे येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी ४२ पुर्ण भरलेले प्लॉस्टीकचे ड्रम प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे एकूण ८,४००/- लीटर केमीकल व चोरी करत असताना मिळून आलेला ड्रम मधील २०० लिटर केमिकल असे मिळून ४३ ड्रम मधील ८,६००/- लिटर केमिकल प्रती ३० रूपये लिटर प्रमाणे किंमत, २ अर्धवट भरलेले प्लास्टीकचे ड्रम प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे अंदाजे त्यामध्ये एकूण २०० लीटर केमीकल प्रती ३० रूपये लिटर किंमत, ९ अर्धवट भरलेले प्लास्टीकचे निळ्या रंगाचे ड्रम प्रत्येकी ३० लीटर क्षमतेचे एकूण १३५ लीटर केमीकल प्रती ३० रूपये लीटर, किंमत, ११ प्लॉस्टीकचे मोकळे ड्रम, टँकर मधून केमीकल काढण्यासाठी व भरण्यासाठी लागणारा पीव्हीसी पाईप, टँकर आणि इतर असा एकूण १०,००,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हणमंत ओऊळकर, पोहवा टी.एस. गगे, पोना डी.ए.जाधव, पोशि एस.डी.आचरेकर, पोहवा संतोष राऊत यांनी केली. दरम्यान, पुढील तपास सपोनिरी पिठे करत आहेत.