कलंकीचा काविळ! फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार…

Published:

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. फडणवीसांनी ट्विटमध्ये कलंकीचा काविळ असे म्हण्टले आहे. तसेच यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकांच्या व्हिडिओ क्लीप्स समोर आणल्या आहेत.

फडणवीसांचे ट्विट…

‘कलंकीचा काविळ’!

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!

6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!

8 ) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page