डोंबिवली – वाहतूक उपविभागाने कसूरदार वाहनांवर धडक कारवाई केली. एकूण 86 कसूरदार वाहनांवर धडक कारवाई केली असून 2,56,100/- रूपये दंड आकारण्यात आला आहे, त्यापैकी 18,300/- रूपये दंड जागीच वसूल करण्यात आला असल्याचे डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि धात्रक, मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभाग,कल्याण यांच्यासह संयुक्तपणे स्व.इंदिरा गांधी चौक, डोंबिवली पूर्व व आणि मच्छी मार्केट, दीनदयाळ चौक परिसर, डोंबिवली पश्चिम येथे हि कारवाई करण्यात आली.

दरम्यान, बेशिस्त वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यासह ही संयुक्त कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.