डोंबिवली – पोलीस आयुक्त ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त ठाणे शहर, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस रेझींग डे निमित्ताने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशान्वये सह पोलीस आयुक्त ठाणे शहर दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते परिमंडळ ३ अंतर्गत कल्याण व डोंबिवली पोलीस विभागातील पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरी, जबरी चोरी, घरफोडी चोरी, इतर चोरी तसेच मिसिंग प्रकरणातील जप्त मुद्देमाल हस्तांतरांचा कार्यक्रम जिमखाना डोंबिवली पूर्व याठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिमंडळ ३, अंतर्गत कल्याण व डोंबिवली विभागातील विविध गुन्हयात पोलीसांनी हस्तगत केलेला सुमारे ७ कोटी ९४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मुळमालक/फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, मोटार वाहने इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.