मुंबई – ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाजपचे काही नेते देखील उपस्थित होते.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून बघितले जाते. त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.