मुंबई – आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.
अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाची बैठक मुंबईत झाली. त्यावेळी अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य करत पवारांचे वय आता ८३ झाले असून, आता तरी तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद दया, असे म्हण्टले यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी हा बाप एकट्या लेकीचा नाही, तुम्हा सगळ्यांचा आहे. बाप आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला, पण बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकून घेऊ एक सांगते, छोटसं बोललं तर डोळ्यात पाणी येईल, संघर्षाची वेळ येते तेव्हा ती पदर खोचून तिच ताराराणी आणि अहिल्या देवी होते, मला अजून लढायचं आहे. ज्यांनी मन घट केले, त्यांचे आणखी आभार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही लोकांचं वय झाल आहे त्यामुळे त्यांनी आशिर्वाद द्यावेत, असे काही जण म्हणाले, का बरं आशिर्वाद द्यावेत. रतन टाटाचं वय काय, सीरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय ८४ घेतलं का नाही इंजक्शन. अमिताभ बच्चन वय काय ८२ फारुक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्ष मोठे आहेत. आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.