मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिला आहे.
राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवारांना पद आणि गोपीनयतेची शपथ दिली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह आणखी काही आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.