सोलापूर – पंढपूरमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज पासून २४ तास खुले राहणार आहे. आषाढी वारी निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विठ्ठल रखुमाईचा पलंग काढण्यात आला आहे. पलंग काढल्यानांतर आषाढी वारी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. आषाढी वारी निमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. ७ जुलै पर्यंत विठोबा-रखुमाईचं दर्शन भाविकांना २४ तास घेता येणार आहे.