डोंबिवलीत 215 कसूरदार वाहन चालकांवर कारवाई…

Published:

डोंबिवली – 215  कसूरदार वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे.

पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर डॉ.विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात एखाद्या महत्त्वाच्या चौकामध्ये जास्तीत जास्त वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार नेमून वाहतूक नियमांची अंमलबजावणी व जनजागृती करण्यासाठी फ्लॅश डिप्लॉयमेंट ही कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत टिळक चौक, डोंबिवली पूर्व या ठिकाणी मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग यांच्या उपस्थितीत फ्लॅश डिप्लॉयमेंट करून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असल्याचे डोंबिवली वाहतूक उप विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

यामध्ये विदाऊट हेल्मेट  -72 , विदाऊट सीट बेल्ट 21, जम्पिंग सिग्नल 10,ब्लॅक फिल्म 01,  ट्रिपल सीट 13,  फ्रंट सीट15 , विदाऊट लायसन 05,  बुलेट सायलेन्सर 1, गणवेश न घालने 20 व इतर 57 अशा एकूण 215 कसूरदार वाहन चालकांवर कारवाई करून 1,62,200/- इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 23,800/-₹  दंड जागीच वसूल करण्यात आला आहे.

या कारवाई मध्ये डोंबिवली विभागाचे 1 अधिकारी, 10 पोलीस अंमलदार व 8 वॉर्डन तसेच कोळशेवाडी उपविभागाचे 3 अंमलदार,1 वॉर्डन व कल्याण उप विभागाचे 2 पोलीस अंमलदार,1 वॉर्डन असे एकूण 1 अधिकारी, 15 अमलदार, 10 वॉर्डन सहभागी होते.

यादरम्यान विशिष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहिती देणारे फलक दाखवून जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे.

दरम्यान, डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व डोंबिवलीकर नागरिकांना या माध्यमातून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून यापूढे सुद्धा वाहतूक विभागाकडून ही करवाई अशीच चालू राहणार असल्याचेही उमेश गित्ते म्हणाले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page