मुंबई – १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवल्यानंतर राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच राहुल नार्वेकर यांनी सुचक विधान केले आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असे विधान त्यांनी केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
राहुल नार्वेकर म्हणाले की, बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असेही नार्वेकर यांनी सूचित केले.
१९७७ साली माझा जन्म झाला आणि याच साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतीकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यावर घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन. असे नार्वेकर म्हणाले.