मुंबई – महाभारत या गाजलेल्या मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारलेले अभिनेते गुफी पेंटल यांचे सोमवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गुफी पेंटल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुफी पेंटल यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बी.आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत शकुनी मामा या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती.