मुंबई – ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गार्गी फुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

गार्गी फुले यांनी १९९८ पासून नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. गार्गी यांनी तुला पाहते रे, राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, कट्टी बट्टी अशा गाजलेल्या मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.