बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

Published:

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरूवार २५ मे) दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल उद्या दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. 

या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

http://hscresult.mkcl.org

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page