डोंबिवली – महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पथकासोबत आलेल्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ग्रामीण भागातील खोणी गावात हि घटना घडली. वीज चोरी पकडण्यासाठी हे भरारी पथक खोणी गावात गेले होते. त्यावेळी सदर पथकावर दगडफेक करण्यात आली आणि त्यांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली.