डोंबिवली – डोंबिवलीत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात आली.
डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक, डोंबिवली पूर्व व दीनदयाळ चौक, डोंबिवली पश्चिम येथे विना गणवेश, विना परवाना, स्टँड सोडून प्रवासी वाहतूक करणे यासह इतर वाहतूक नियम मोडणाऱ्या एकूण ६२ कसूरदार रिक्षाचालकांवर धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान १,९३,०००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, बेशिस्त रिक्षाचालकांवर ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वपोनि उमेश गिते यांनी महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधीला दिली.