ठाणे – स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने अटक केली. हरून महादेव सागवेकर असे याचे नाव आहे.
मागील काही दिवसामध्ये ठाणे शहरात स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाच्या टोळी कडून चोरीच्या घटनेत वाढ झाली झाली होती. अशा प्रकारचा एक गुन्हा वागळे इस्टेट पो.स्टे येथे दाखल झाला होता. त्यानुषंगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हरून महादेव सागवेकर यास अटक केली.
सदर यशस्वी कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत सा. (शोध २ गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सपोनि महेश जाधव, पोलीस अंमलदार स्वप्नील प्रधान, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, रूपवंत शिंदे, किशोर भामरे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, गीताली पाटील यांनी केली.