ठाणे – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा योजनेच्या नवीन टाकलेल्या मुख्य जलवाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार, १२ मे दुपारी १२.०० ते शनिवार, १३ मे दुपारी १२.०० वाजेपर्यंत २४ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये तसेच वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
शनिवारी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.