मुंबई – मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवार ९ मे २०२३ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
विश्वनाथ महाडेश्वर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत होते. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले होते. मुंबई मनपात त्यांनी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी काम केले होते. पहिल्यांदा २००२ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. ते मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात मुंबई मनपाचे महापौर होते.