मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसोबत ठाण्यातील पदाधिकार्यांनीही राजीनामे दिले आहेत. शरद पवार यांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करून म्हणाले आहेत की, साहेब नेहमी म्हणतात की, लोकशाही मध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो.मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना.हीच खरी लोकशाही आहे..!
अस असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.लोकशाहीत विश्वास ठेवणारे पवार साहेब असा निर्णय घेवूच कसा शकतात.हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं..? राज्यात आणि देशात सध्या ज्या प्रकारच वातावरण आहे त्यात आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय कसे लढू शकतो..आम्हाला त्यांची गरज आहे.
आणि म्हणूनच मी जितेंद्र आव्हाड,पवार साहेबांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे.माझ्यासहित ठाण्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.