मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन दावोस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच आहे. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील.जागतिक आर्थिक परिषदेच्या न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी या केंद्राचे तसेच अर्बन ट्रान्सफॉरमेशनचे प्रमुख देखील मुख्यमंत्र्यांना भेटतील. दावोसमध्ये जवळपास 20 उद्योगांशी सुमारे 1.40 लाख कोटींचे करार होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी रविवारी संध्याकाळी रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटच्या पिचवर जोरदार फटकेबाजी केली.