मुंबई – मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार धीरज अपार्टमेंट या रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. हि सहा मजली इमारत आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.