अयाेध्येला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भव्य प्रवेशद्वार असतील. त्यांना रामायणातील विविध पात्रांची नावे दिली जाणार आहेत. त्यामुळे अयाेध्येत प्रवेश करताच आता भाविक तसेच पर्यटकांना याचे दर्शन हाेईल. लखनऊ मार्गे येणाऱ्या भाविकांना ‘श्रीराम द्वारा’तून प्रवेश करता येईल. गाेरखपूर मार्गावर ‘हनुमान द्वार’ असेल. अलाहाबाद राेडवर ‘भरत द्वार’, गाेंडा राेडवर ‘लक्ष्मण द्वार’, वाराणसी राेडवर ‘जटायू द्वार’, रायबरेली राेडवर ‘गरुड द्वार’ असेल. अयाेध्येत जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध हाेतील. त्यात व्यापक वाहनतळ, स्वच्छतागृहे, रेस्तराँ, हाॅटेल्स आणि प्रत्येक प्रवेशद्वारही असे भव्य असेल, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी नितीश कुमार यांनी वृत्तसंस्थेला दिली.मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. श्रीराम मंदिर उभारणी सुरू असून भाविकांचा हा आेघ सातत्याने वाढत असल्याचे दिसते. श्रीरामाचे भव्य मंदिर २०२४ मध्ये तयार होणार असून त्यादृष्टीने वेगात बांधकाम सुरु आहे.