सक्षम-२०२३ चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते २४ एप्रिलला उद्घाटन…

Published:

मुंबई नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ऊर्जा संरक्षण नेट झीरोकडे च्या दिशेने या टॅग लाईन सह संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३ ) चे आयोजन केले आहे. सक्षम-२०२३ अंतर्गत महाराष्ट्र राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध १००० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तेल उद्योगाचे समन्वयक संतोष निवेंदकर यांनी केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page