डोंबिवलीत डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू…

Published:

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील रस्त्यावर डंपरखाली चिरडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. डीएमके जावळी बँकेच्या समोरील रस्त्यावर पायी चालत जात असताना सळईने भरलेल्या डंपरखाली चिरडून सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. देवभाई रावल असे मृत व्यक्तीचे नाव असून वय ५३ आहे.

घटनेची माहिती मिळताच राम नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी सदर मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. डंपर चालक फरार झाला आहे.

दरम्यान, डोंबिवलीत अशा घटना वारंवार घडत आहेत. अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे तरी सुद्धा अशी अवजड वाहने सर्रास शहरात येतात परंतु डोंबिवली वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याबाबत अनेक तक्रारी अर्ज डोंबिवली वाहतूक विभागास प्राप्त आहेत पण याची दखल वरिष्ठ घेताना दिसत नाही. त्यामुळे आता या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे? 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page