गुजरात – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीप्रकरणी राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा झाली होती. या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सूरत न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार देत त्यांची याचिका फेटाळली आहे.