नांदेड- वीज तारेला चिटकलेल्या आपल्या लहान भावाला वाचवरणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातल्या थडी सावळी येथील 13 वर्षांच्या लक्ष्मी येडलेवार या विद्यार्थिनीला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार मिळाल्याचा लक्ष्मीने आनंद व्यक्त केला. तिला आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना भेटायचे आहे. पुढे खूप शिकून डॉक्टर किंवा कलेक्टर व्ह्यायची तिची इच्छा आहे. येत्या 26 जानेवारी रोजी दिल्लीत या पुरस्काराने लक्ष्मीचा गौरव केला जाणार आहे.
गावाला झाला आनंद
भारत सरकारकडून शूरवीर बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा तो मान महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातल्या अवघ्या 13 वर्षांच्या लक्ष्मीला मिळाला आहे. याबद्दल तिच्या थडी सावळी गावाचा आनंदही गगनात मावत नाही आहे. लक्ष्मीने विद्युत तारेला चिकटलेल्या आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तिच्या या शौर्याचे आता राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे.