नाशिक – २५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगेहात पकडले. नितीन सगाजी मेहेरखांब असे याचे नाव असून, ते सजा, पाथरे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचे पाथरे, खु.ता. सिन्नर जि. नाशिक येथे गावठाण हद्दीत जुने घर असून त्यांनी सदर घराचा काही भाग व ओटा तोडून २ मजली इमारत बांधली असून, सदर गावठाण मधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याच्या मोबदल्यात नितीन मेहेरखांब यांनी ५०,०००/- रु. लाचेची मागणी करून त्याचा पहिला हफ्ता २५,०००/- रु घेतला असता एसीबीने त्यांना रंगेहात पकडले.