मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचे ट्वीट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्याचे ट्विट सध्या चर्चेत आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे.