ठाणे – चाकूचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी असे याचे नाव असून, त्याच्याकडून जबरी चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले.
याबाबत वृत्त असे आहे कि, गस्ती दरम्यान मुंबादेवी मंदीराच्या पायथ्या जवळ ३ इसम ट्रक व कंटेनरना अडवून, त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरीने मोबाईल व पैसे काढून घेत असताना पोलिसांना दिसून आल्याने पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यातील २ इसम पळून गेले. त्यापैकी एका इसमाला पोलिसांनी पकडले. त्याचे नाव नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी असे असून, त्याने त्याचे पळून गेलेले साथीदार करण विजय तेलकर आणि बाबू यांच्यासह मिळून ट्रक, कंटेनर चालकांना लुटल्याचे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी यास अटक करून, एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले.