ठाणे – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या विरोधात ठाण्यात महाविकास आघाडीने भव्य जनप्रक्षोभ मोर्चा काढला. तलावपाळी ते पोलीस आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे यांच्यासह तीनही पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.