फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांसाठी?…
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील फुटपाथवर फळ विक्रेते आणि काही दुकानदारांकडून अतिक्रमण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फळ विक्रेत्यांनी दुकान थाटली आहेत तर तेथील दुकान समोर लोखंडी जाळी तसेच पुतळे आणि बोर्ड उभे केले आहते. याचा नाहक त्रास तेथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
अगोदरच हे फुटपाथ लहान आणि अरुंद आहेत त्यात अशा प्रकारे अतिक्रमण झाल्यावर तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या पादचाऱ्यांना चालताना अडचण होत आहे. या परिसरात नेहमी नागरिकांची गर्दी असते त्यात फुटपाथवर अशा पद्धतीने अतिक्रमण केल्यावर त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
सदर बाबत ‘फ’ प्रभाग क्षेत्र विभागात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाहीये. ‘फ’ प्रभाग क्षेत्रातील अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत? कारवाई फक्त दाखवण्यापुरतीच केली जाते का? अशी चर्चा नागरीक करत आहेत.तेव्हा या अतिक्रमण धारकांवर कारवाई कधी होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.