ठाणे – आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून करून १६ वर्ष फरार असलेल्या दोघांना उत्तराखंड राज्यातून गुन्हे शाखा, कक्ष – 3 विरार पोलिसांनी अटक केली. पुरणसिंग प्रतापसिंग उन्योनी ऊर्फ पुरणसिंग कापुरसिंग परिहार आणि मोहनसिंग प्रतापसिंग उन्योनी ऊर्फ मोहनसिंग कापुरसिंग परिहार अशी या दोघांची नावे आहेत.
मुंबई-अहमदाबाद हायवे रोड क्रमांक ८ च्या पूर्वेस, गुरुकृपा हॉटेलच्या समोर, कर्नाल पाडा गावाकडे जाणा-या रोडच्या बाजूला अज्ञात इसमांनी एका अनोळखी इसमास हत्याराने जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह झाडी झुडपात टाकून दिले म्हणून फिर्यादी मधुकर सनकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणयात आला होता. तसेच गुन्हयातील मयत इसमाची ओळख संजय विनोद झा असे निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून दोघांना उत्तराखंड राज्यातून अटक केली. तसेच पुढील कारवाईकरीता त्यांना माणिकपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.